रावेर/फैजपूर : रावेरसह सावदा व न्हावी येथील कोविड सेंटरला प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सहाय्यक नोडल ऑफिसरची सोमवारी नेमणूक केली आहे. हे सर्व नोडल ऑफिसरला मदत करणार आहे. यामध्ये समाज कल्याण मुलांचे वस्तिगृह येथील कोविड सेंटरला सहा.अभियंता इमरान शेख यांची नेमणूक करण्यात आली तर व्ही.एस.नाईक महाविद्यालयासाठी शाखा अभियंता व्ही.के.तायडे तर आदिवासी मुलांच्या वस्तीगृहासाठी सहा.अभियंता गणेश भुगरे, कुसुमताई मंगल कार्यालय व नगरपालिका सावदा येथे सह अभियंता मनोहर तायडे तसेच जे.टी.महाजन वस्तिगृह, न्हावी येथे सुमित पाटील, अजित निंबाळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटरला मदत करणार आहेत.