जळगावच्या वैध मापन निरीक्षकांची तक्रारीनंतर कारवाई ; ‘जनशक्ती’ने वृत्ताद्वारे वेधले होते लक्ष
रावेर (शालिक महाजन)– शहरातील बर्हाणपूर रोडवरील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट होत असल्याची तक्रार युवा सेनेसह गोपाल मिस्तरी या तक्रारदाराने तहसील प्रशासनाकडे केली होती तर शुक्रवारच्या अंकात ‘दैनिक जनशक्ती’ने ठळक वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनात खळबळ उडाली. जळगावचे वैध मापन निरीक्षक सी.डी.पालीवाल यांच्या पथकाने पंपावर छापा टाकत इंधनाचे नमूने घेतले. तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर इंडियन ऑईलच्या पंपावर दोन्ही पेट्रोलचे युनिट सील करण्यात आल्याने शहर व तालुक्यता मोठीच खळबळ उडाली. कारवाईप्रसंगी निरीक्षक ए.व्ही.पाटील तसेच नायब तहसीलदार सी.एस.पाटील उपस्थित होते.