रावेर : रावेर पंचायत समितीतील वैयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या दिड कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी रावेर पोलिसांनी मंगळवारी रात्री पुन्हा अटकसत्र राबवत तालुक्यातील विविध गावांतून तब्बल सहा आरोपींना अटक केल्याने भ्रष्टाचार करणार्यांच्या गोटात कमालीची खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींना बुधवारी रावेर न्यायालयात हजर केले असता 1 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. संशयीतांची अनुदान वर्ग करण्यात व लाटण्यात भूमिका असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
या आरोपींना केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावेर पंचायत समितीतील वैयक्तीक शौचालय योजनेतील भ्रष्ट्राचारप्रकरणी रावेर पोलिसांनी मंगळवाी रात्री तालुक्यातील प्रदीप वेडू धनगर (बलवाडी), राहुल जीवन सोनार (निंभोरा), अशोक हरी पाटील (सिंदखेड), गोपाळ वेडू गुरव (बलवाडी), जितेंद्र मंगळु अडगावकर (गाते), राहुल मुरलिधर कोळी (पूरी) यांना अटक केली आली आहे. या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या अठरावर पोहोचली आहे.