रावेर : रावेर पंचायत समितीतीतील शौचालय योजनेची चौकशी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून गुरुवारपासून सुरू झाली आहे. दोन ते तीन दिवस ही चौकशी चालणार असून त्यांनतर चौकशी अहवाल सादर करण्यात येईल. वरीष्ठ अधिकार्यांकडून सुरु झालेल्या चौकशीने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
प्रधान सचिवांकडे केली होती तक्रार
रावेर पंचायत समितीच्या वैयक्तिक शौचालय अनुदानात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रधान सचिवकडे तक्रार केली होती. याची दखल घेवून या प्रकरणाची चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचा आदेश विभागीय आयुक्ताना दिलेला आहे. जिल्हा परीषदेचे वरीष्ठ अधिकार्यांचा समितीत समावेश आहे. दिवसभरात या पथकाकडून वैयक्तिक शौचालय योजना व पंचायत समितीने राबविलेल्या विवीध योजना गैर व्यवहारप्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही चौकशी सुरु होती.