रावेरातील लो प्राईज सुपर शॉपची तपासणी

0

ग्राहकाच्या तक्रारीनंतर जळगावच्या वैधमापन विभागातर्फे कारवाई

रावेर- शहरातील लो प्राईज सुपर शॉपची जळगावच्या सहाय्यक नियंत्रण वैधमापन शास्त्र अधिकार्‍यांनी गुरुवारी सकाळी अचानक तपासणी केल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली. शहरातील तक्रारदार योगेश भाऊराव नन्नवरे यांनी या दुकानासंदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने लो प्राईज शुपरशॉप या सुपरशॉपीतून 13 जानेवारी रोजी रात्री 8.35 वाजता 644 रुपयांचा किराणा सामान घेतला होता तर 500 ग्रॅम तुरदाळीची घरी तपासणी केली असता ती केवळ 250 ग्रॅम भरल्याने त्यांनी न्यायासाठी संबंधित विभागाकडे दाद मागितली. गुरुवारी वैधमापन निरीक्षक पालीवाल व सहकार्‍यांनी सुपर शॉपची तपासणी केली. दरम्यान, सुपरशॉपचे संचालक महेश जयसिंघानी म्हणाले की, संबंधित अधिकार्‍यांनी केलेल्या तपासणीत कुठलेही तथ्य आढळलेले नाही. त्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करणे अयोग्य ठरेल.