Ravera multi-crore toilet corruption Case : Nine More Accused Arrested रावेर : राज्यात गाजलेल्या रावेरातील वैयक्तिक शौचालय योजनेतील कोट्यवधींच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी आता बड्या माशांकडे लक्ष वेधले आहे. आता नव्याने एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आल्याने भ्रष्टाचार करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. अटकेतील आरोपींची संख्या आता 33 वर पोहोचली आहे.
या आरोपींना अटक
रावेर पंचायत समितीतील बहुचर्चित शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी पोलिसांनी अटकसत्र राबवित वेगवेगळ्या गावातून नऊ आरोपींना अटक करण्यात आली. त्यात गोकुळ करुले (अटवाडे), ललित सोनार (निंभोरा), बाळू कोळी (रणगाव), विश्वनाथ कोळी (रायपूर) , प्रवीण इंगळे (रावेर), भूषण पाटील (धामोडी), गोकुळ रुले (मस्कावदसीम), युवराज बोदडे (निंभोरा), रवींद्र पाटील (मोरगाव) यांना अटक करण्यात आली.