रावेर : शहरातील एका 27 वर्षीय युवकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. तिसर्या दिवशी शेमळदे गावानजीक मयत तरुणाचा मृतदेह आढळला. सतीश रमेश महाजन (27, रावेर) असे मयताचे नाव आहे. सतीश महाजन या तरुणाने रविवारी निंभोरासीम येथील तापी नदीच्या पुलावरील रात्री उडी घेऊन आत्महत्या केली. तापी नदीत शोधण्याचा प्रयत्न केला असता तरुणाचा मृतदेह बुधवारी शेमळदानजीक आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.