रावेर : रावेर शहरातील शिवाजी चौक परीसरातील 28 वर्षीय अविवाहित युवकाने तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी घडली. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. योगेश प्रभाकर महाजन (28, शिवाजी चौक, रावेर) असे मयत युवकाचे नाव आहे
नदीपात्रात आढळला मृतदेह
रावेर शहरातील शिवाजी चौक परीसरातील योगेश प्रभाकर महाजन (28) हा युवक घरी कोणाला न सांगता बुधवार, 17 रोजी सायंकाळी सात वाजता टिव्हीएस कंपनीची दुचाकी (एम.एच.19 पी.सी.7228) घेवून घराबाहेर पडला मात्र घरी न परतल्याने कुटुंबियांसह नातेवाईकांनी सर्वत्र शोध सुरू केला असता तरुणाची दुचाकी निंभोरासीमच्या तापी नदीवर दिसून आली तर योगेशचा शोध घेतला असता तापी पात्रात युवकाचा मृतदेह आढळला.