रावेरातून अ‍ॅपेरिक्षातील स्टेपनीची चोरी

0

रावेर । सावदारोडवरील उभ्या अ‍ॅपेरिक्षातील स्टेपनी (चाक) चोरुन नेल्या प्रकरणी भुसावळ येथील एकास रावेर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत वृत्त असे की, रावेर येथील इमामवाड्यातील इस्माईलखान खान याने जिलेबी सेंटर जवळ अ‍ॅपेरिक्षा उभी केली होती. कोणीतरी अज्ञात चोरट्याने अ‍ॅपेरिक्षा मधील हजार रूपये किंमतीची स्टेपनी ड्रायव्हरशिट खालुन चोरुन नेली. बाबत रावेर पोलीस स्टेशनला भादवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्याचा आला असुन पोलीस पथकाने भुसावळ येथून प्रविण मकासरे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन चोरी गेलेली हजार रूपये किंमतीची स्टेपनी चाकडिस्कसह जप्त करुन ताब्यात घेतले. पुढील तपास पो.ना. ओमप्रकाश सोनी, पो.कॉ. जाकर पिंजारी, भरत सोपे हे करीत आहेत.