रावेर : मध्यप्रदेशाकडे पायीच निघालेल्या प्रवाशांसह कामगारांसाठी रावेर आगारातून रविवारी दुपारी एक बस 22 प्रवाशांना घेवून रवाना झाली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या चोरवड पर्यंत सर्व प्रवाशांना सोडण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
बस रवाना करतेवेळी रावेर नायब तहसीलदार सी.जी.पवार, रावेर आगार व्यवस्थापक निलेश बेंडकुळे, मंडळाधिकरी सचिन पाटील, रावेर पोलिस कॉन्स्टेबल निलेश लोहार व चालक विलास तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल निलेश लोहार आणि पीडब्ल्यूडी विश्रामगृह व्यवस्थापक हेमंत बडगुजर हे एकमेव असे आहेत की ते ड्युटी व्यतिरिक्तही कित्येक दिवसांपासून या परप्रांतीयांची राहण्यापासून जेवणापर्यंत आणि प्रवासासाठी काळजी आणि व्यवस्था करत आहेत.