रावेरात अवैधरीत्या वाळू वाहतूक ; प्रांतांनी सुनावला 11 लाखांचा दंड

0

वाळूचे पाच ट्रॅक्टर जप्त ; अवैध वाहतूकदारांनी कारवाईचा घेतला धसका

रावेर- अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी जप्त करीत प्रत्येकला दोन लाख 20 हजारांचा दंड सुनावलयाने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली. शनिवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान वाळू माफिया ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे तापी नदीतून विना परवानगी वाळू घेण्यासाठी आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, नायब तहसीलदार पी.सी.धनगर व पथकाला लागताच ते रावेरला आले.
शहरातील आठवडे बाजार परीसरात दोन ट्रॅक्टर-ट्रॉली तर तापी नदीतून निंभोरासीमनजीक अवैध वाळू वाहतूक करणारे तीन अश्या एकूण पाच ट्रॅक्टर-ट्रॉलीवर धडक कारवाई केली. जत जप्त करण्यात आलेल्या तीन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर प्लेट नसल्याचे दिसून आले तर नऊ मोबाईलदेखील जप्त करण्यात आले. पकडलेल्या पाच ट्रॅक्टर-ट्रॉलीकडून सुमारे अकरा लाखाचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.