रावेरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त

रावेरसह पाल परीसरात अवैध वाळू वाहतुकीला ऊत : धडक कारवाईची अपेक्षा

रावेर : रावेरसह पाल परीसरात अवैध वाळू वाहतुकीला ऊत आला असून तीन दिवसांपूर्वी तीन अवैध वाळूचे ट्रक्टरे जप्त केल्यानंतर बुधवारी पहाटे नंदुरबार येथून तापी नदीची वाळू घेऊन आलेलाट्रक महसूलच्या पथकाने जप्त केल्यान अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. रावेर व पाल परीसरात ‘सैराट’ सूटलेले वाळू चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे. ‘दैनिक जनशक्ती’चे वृत्त खरे ठरले असून या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

अवैध वाळू वाहतूक पुन्हा ऐरणीवर
रावेरसह निंभोरासीम व पाल परीसरात मोठ्या प्रमाणात नदी पात्रातुन वाळूचे उत्खनन होत असतांना बुधवारी रावेर शहरात महसूल पथकाने मोठी कारवाई केली आहे. नंदुरबार येथून वाळु घेऊन आलेला ट्रक (एम.एच.43 वाय.8087) हा वाळू भरून रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात परीसरात खाली होत असताना गोपनीय माहितीच्या आधारावर महसूल पथकाने धाड टाकून ट्रक चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडील परवाना व ऑनलाइन ईटीपी पाहिल्यानंतर त्याची मुदत संपल्याने ट्राला जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आला.

महसूल पथकाने केली कारवाई
रावेर शहरातील कारवाई मंडळ अधिकारी जे.डी.भंगाळे (खिरोदा प्र.यावल), विठोबा पाटील (खानापूर), जी.एन.शेलकर (ऐनपूर), तलाठी निलेश चौधरी (सावखेडा), शैलेश झोटे (केर्‍हाळा, रवी शिंगणे (अटवाडा), भगत अप्पा (खानापूर), रोशनी शिंदे (खिरोदा प्र.यावल), दादाराव कांबळे (रावेर) आदींच्या पथकाने केली.

सैराट वाळु चोरट्यांवर अंकुश लावण्याची गरज
पाल येथील सुकी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचे उत्खनन सुरू आहे. तालुक्यातील रसलपूर, कुसुंबा भागात पांढर्‍या रंगाच्या 407 पिकअप गाडीतून वाळूची वाहतूक होत असल्याचा संशय आहे. याकडे येथील तलाठी गुणवंत बारेला यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप असून महसूल प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे.