रावेरात अवैध गुटख्याची विक्री

0

अन्न व औषध प्रशासनाचा कानाडोळा

रावेर : शहरात खुलेआमपणे बंदी असलेल्या गुटख्याची विक्री सुरू आहे. कारवाईची जबाबदारी असलेला अन्न व औषध प्रशासन विभाग या प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याने नागरीक संतप्त् झाले आहेत. महाराष्ट्रात गुटखा बंदी असलीतरी त्यास रावेर शहर अपवाद ठरले आहे. पानटपर्‍या, किराणा दुकानात सहज गुटखा उपलब्ध होत आहे त्यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जावून बरबाद होत असल्याचे चित्र आहे.