रावेर : रात्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे टॅक्टर-ट्रॉली उप विभागीय पोलिस अधिकार्यांनी जप्त करीत ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
गुरुवार, 24 रोजी पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एम.एच.21-0151) मधून उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी जप्त केले. या प्रकरणी रावेर पोलिसात इरफान छबु तडवी (32) व शेख सौद शेख शाकीर (दोन्ही रा.बंडू चौक, रावेर) यांच्याविरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिड लाख रुपये किंमतीचे स्वराज ट्रॅक्टर, 60 हजार रुपये किंमतीची ट्रॉली व तीन हजार किंमतीची एक ब्रास वाळू, 25 हजार किंमतीची दुचाकी मिळून एकून दोन लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास पोलिस कॉन्स्टेबल सुरेश मेढे करीत आहेत.