रावेरात आठवडे बाजारात राडा; टल्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

0

रावेर: शहरातील आठवडे बाजारात दत्त जयंतीनिमित्त निघालेल्या पालखीची मिरवणूक सुरू असताना शाब्दीक वाद विकोपाला गेल्याने हाणामारी होवून एक जखमी झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच्या डोक्यात दगड घातला
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, दत्त जयंतीनिमित्त निघालेल्या पालखी मिरवणुकीसाठी आठवडे बाजारात भाविकांची मोठी गर्दी असतानाच अतुल महाजन व टल्या उर्फ चेतन हंसकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. संशयीत टल्याने अतुल यांच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली. या प्रकरणी जीवन महाजन यांच्या फिर्यादिवरून टल्या व त्यांच्या पाच अनोळखी सहकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार गजेंद्र पाटील, कॉन्स्टेबल हरीलाल पाटील करीत आहे.