रावेर : शहरातील आठ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून तालुक्यातील निंभोरासीम येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहर व तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांपासून रावेर शहरात कोरोना शिरकाव झाला नव्हता परंतु आता रोज एक रुग्ण पॉझीटीव्ह येत असल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे तिघेही रुग्ण राहत असलेला परीसर सील करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत. दरम्यान, नागरीकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.