रावेर । माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर ग्रामीण रुग्णालयात आमदार हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते रुग्णांना फळवाटप करण्यात आले. रावेर शहर व परिसरातील विविध भागातील समस्या आमदार श्री जावळे जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा युवा जिल्हाउपाध्यक्ष अमोल पाटील, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, पं.स.सदस्य पी.के. महाजन, सौ वानखेडे, मोरगाव येथील प्रल्हाद पाटील, शहराध्यश मनोज श्रावण, नगरसेवक यशवंत दलाल आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.