रावेर । रावेर शहरातील रात्रीची गस्त सुरळीत व प्रामाणिक व्हावे यासाठी आरएफआयडी (मशीन)चे उद्घाटन अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याहस्ते आज पोलिस स्थानकात शुभारंभ करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरएफआयडी (मशीन)चे उद्घाटनानिमित्त आईपीएस श्री. सिंग रावेरात आले होते. यावेळी त्यांनी मशीनची संपूर्ण माहीती उपस्थित पत्रकारांना त्यांनी दिली. त्यामुळे रात्रीची गस्त अधिक सुरक्षीत व प्रामाणिक होईल हे मशीन एटीएम राष्ट्रपुरुषाचे पुतळे संवेदनशील ठिकाणी लावण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरेची संख्या वाढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, सपोनि गजेंद्र पाटील, फौजदार नेताजी वंजारी, पोकॉ हरिलाल पाटील, जाकिर पिंजारी, विनोद पाटील, जितेंद्र पाटील आदि उपस्थित होते.