रावेरात आरक्षणानंतरही विद्यमान नगरसेवकांना दिलासा
हरकतीनंतर होणार चित्र स्पष्ट : इच्छूकांच्या मोर्चेबांधणीला वेग
रावेर : रावेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. 12 प्रभागातील 24 जागांसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमुळे विद्यमान नगरसेवकांना काहीसा दिलासा मिळाला आहे मात्र हरकतीअंतीच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. या सोडतीत ओ.बी.सी.जागा आरक्षण वगळण्यात आले आहे.
असे आहे रावेरातील आरक्षण
प्रभाग एक अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण प्रभाग दोन अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग तीन अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग चार अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग पाच अ- एस.सी.महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सहा अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग सात अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण , प्रभाग आठ अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण प्रभाग नऊ अ- सर्वसाधारण महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग दहा अ- एसटी महिला, ब- सर्वसाधारण, प्रभाग अकरा अ- सर्वसाधारण महिला, ब- एससी सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक बारा अ- महिला सर्वसाधारण, ब- सर्वसाधारण.
यांची आरक्षण सोडतप्रसंगी उपस्थिती
रावेर नगरपालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी मार्गदर्शक सुचना माहिती देवून जाहिर केली. त्यांना मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे व सहकारी आधिकारी कर्मचार्यांनी सहकार्य केले. यावेळी माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद, पद्माकर महाजन, प्रल्हाद महाजन, शीतल पाटील, राजेंद्र चौधरी, रवींद्र पवार, आसीफ मोहम्मद, योगेश गजरे, भास्कर महाजन, गयास शेख, महेमूद शेख, युनूस खान, बाळू शिरतुरे, डी.डी.वाणी, जगदीश घेटे, उमेश महाजन, अरुण शिंदे, दिलीप पाटील, यांच्यासह पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.