A textile businessman committed suicide by hanging himself in Rawer, Jalgaon रावेर : शहरातील रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील संरक्षण भिंतीच्या अलीकडे असलेल्या गॅरेजच्या शेडमध्ये जळगावातील 38 वर्षीय कापड व्यावसायीकाने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. इमरान खान अकबर खान (38, शिवाजी नगर, उमर कॉलनी, बरकते मशीदजवळ, जळगाव) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून मृत व्यावसायीक निर्वस्त्र अवस्थेत आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध
इमरान खान अकबर खान (38, शिवाजी नगर, उमर कॉलनी, बरकते मशीदजवळ, जळगाव) हे कापड व्यावसायीक असून ते गुरुवारपासून घरातून निघून गेले होते तर रात्री उशिरा घरी परतल्यानंतर त्यांच्याकडे विक्रीसाठी नेलेले कपडे नव्हते व घरी आल्यानंतर ते खूप भयभयीत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रावेर शहरात स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालयानजीक शनिवारी सकाळी इमरान खान यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात? याबाबत रावेर पोलिसांकडून तपासाला वेग दिला आहे.