रावेर : सीसीआयमार्फत सुरू असलेले कापूस खरेदी केंद्र पुन्हा बंद पडले असून रावेर तालुक्यातील सुमारे 90 शेतकरी वंचित राहिले आहे. तालुक्यातील शेतकर्यांकडील कापसाची सीसीआयकडून खरेदी केली जात होती व यासाठी शासनाने प्रती क्विंटल पाच हजार 194 रुपये भाव असून लॉकडाउन लागल्यापासून 216 शेतकर्यांकडील तीन हजार 553 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली होती मात्र 29 जूनपासूनपासुन खरेदी केंद्र बंद असल्याने अद्यापही 90 शेतकर्यांकडील कापसाची खरेदी झालेली नाही. ग्रेडर गणेश कराले यांच्याकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.