रावेरात कोरोना योद्ध्यांचा वाढदिवस उत्साहात

0

रावेर : कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी अविरतपणे कार्यरत असणार्‍या दोन कोरोना योद्ध्यांचा वाढदिवस शनिवारी अनोख्या पध्दतीत साजरा करण्यात आला.

नाविण्यपूर्ण पध्दतीत साजरा झाला वाढदिवस
फैजपूर उपविभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे या दोन्ही पोलिस अधिकार्‍यांचा वाढदिवस शुक्रवारी असल्याने कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र झटणार्‍या या योद्ध्यांचा वाढदिवस नाविण्यपूर्ण पध्दतीत साजरा करण्यात आला. रावेर कोव्हीड सेंटर येथे क्वॉरंटाईन असलेल्या 95 रुग्णांना आरोग्य अधिकारी तसेच डॉ.एन.डी.महाजन, डॉ.रोशन पाटील, डॉ.तडवी, मुख्याधिकारी लांडे, नगरसेवक राजेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येकाला 250 ग्राम पेंडखजुर, हळदीयुक्त दूध, केळी असा अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले तसेच सर्वांनी मास्क घालून अल्पोपहाराचे वाटप केले.