रावेर । प्रत्येक ग्राहकाने दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे घेतलेल्या वस्तुची शहानिशा करूनच खरेदी करावी, असे अवाहन नायब तहसीलदार सी.एच.पाटील यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यलयात शहरातील ग्राहकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रांतधिकारी डॉ.अजीत थोरबोले, नायब तहसीलदार कविता देशमुख, एम.ए. खान, दिलीप कांबळे, प्रेमचंद गांधी, प्रशांत बोरकर, हरीष गनवानी, पुरवठा निरिक्षक शैलेश तरसोदे, पुरवठा अव्वल कारकुन शेखर तडवी, विट्ठल पाटील आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पी.आर.धनगर, तेजस पाटील, एस.जे.महाजन, कैलास राठोड, काशीनाथ शिंदे, गौरव इंगळेे, मगन पाटील, डी.एस.कचरे, बी.एन.वानखेडे आदींची उपस्थिती होती.