यावल : जळगाव जिल्हा पेठ पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक करण्यात यावल पोलिसांना यश आले आहे. मुबारक नबाब तडवी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यावल पोलि स्टेशन मध्ये वड्री व परीसरातील शेतकर्यांना ठिबक नळ्या मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासह अन्य गुन्हे आरोपी तडवीविरुद्ध दाखल होते तर एका गुन्ह्यात जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनाही तो वॉण्टेड होता मात्र नेहमीच गुंगारा देण्यात तो यशस्वी होत असल्याने त्याचा शोध सुरूच इोता. यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना आरोपी मुबारक तडवी हा वड्री गावा जवळ असलेल्या मराठी जिल्हा परीषदेच्या शाळेजवळील केळीच्या बागेत लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस कर्मचारी संजय तायडे, निलेश वाघ, गणेश ढाकणे व पोलिस मित्र युवराज धारू यांनी केली. पोलिसांना पाहताच आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास अटक करण्यात आली.