रावेरात चोरी करताना एकास रंगेहाथ पकडले

रावेर शहरातील घटना : दोघा आरोपींविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल

रावेर : शहरातील रामकिसन राजपूत हे जीआयएस कॉलनीत राहतात.शुक्रवारी रात्री 9.30 ते 10 वाजेच्या दरम्यान बबलू उर्फ उखा नामदेव गायकवाड व सुनील भील या दोन चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश करीत डब्यातील पाच हजारांची रक्कम चोरली व त्याचवेळी डब्याचा आवाज झाल्याने घर मालक रामकिसन यांनी बबलू उर्फ उखा गायकवाड यास पकडले. संशयीताच्या ताब्यातून चोरलेले पाच हजार रुपये जप्त करण्यात आले. रामकिसन राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार ईस्माइल शेख, पोलीस नाईक नितीन डांबरे अधिक तपास करीत आहेत.