रावेर : श्री.ओंकारेश्वर ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व 150 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. येथील माऊली हॉस्पीटल च्या प्रांगणात झालेल्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.आर.पाटील होते. मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या शासकीय योजनांबाबत तहसीलदार विजयकुमार ढगे, कायदे विषयक पो.नि.नरेंद्र पिंगळे व महाराष्ट्र बँकेचे सुरदास बँकेच्या सुविधा, संजय गांधी योजनेचे शिवाजी पाटील, तसेच अध्यक्ष डॉ.एस आर पाटील यांनी संघटने बाबत मार्गदर्शन केले.
150 जणांच्या केल्या विविध तपासण्या
व्यासपिठावर नायब तहसीलदार सी.एच.पाटील, उपनगराध्यक्षा रंजना गजरे, डॉ.आर.एन.पाटील, माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. डॉ.योगेश महाजन, इम्रान शेख, हेमंत शाल्व यांनी सुमारे 150 ज्येष्ठ नागरिकांची रक्त गट तपासणी, रक्त दाब, शुगरची तपासणी केली. यावेळी बी.आर.पाटील,सिताराम महाजन, प्रल्हाद महाजन, एस.एल.चौधरी, यादवराव पाटील, वामन चौधरी, गंभीर चौधरी, रमेश भारंबे, रामदास पाटील, विनायक महाजन, रामभाऊ पाटील, काशिनाथ रायमळे, रमजान तडवी, आशालता राणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अहवाल वाचन श्यामराव चौधरी, प्रास्ताविक दयाराम मानकरे यांनी केले. सुत्रसंचालन दिपक नगरे तर आभार एस.बी. महाजन यांनी मानले. तसेच कार्यक्रमाला मोठया संख्येत जेष्ठ नागरिक उपस्थित होते.