रावेरात ड्यूरो सेंटरसाठी तहसीलदारांनी दिले एक दिवसांचे वेतन

रावेर : रावेर ग्रामीण रूग्णालयात ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी तहसीलदारसह कर्मचार्‍यांनी 23 हजार पाचशे रुपये जमा केले आहे. यात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आपला पूर्ण एक दिवसाचा पगार दोन हजार दोनशे रुपये ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी दिले आहे.

ड्यूरो सेंटरसाठी तालुक्यातून प्रतिसाद
रावेर ग्रामीण रूग्णालयात ड्यूरो सेंटर उभारण्यासाठी रावेर तालुक्यातुन भर-भरून प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत पाच लाखाच्या वर कॅश व चेक स्वरुपात निधी जमा झाला आहे. यात तहसीलदारांसह कार्यालयीन अधिकारी मंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी 23 हजार 500 रुपये कॅश स्वरुपात जमा केला आहे. लवकरच रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटरच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.

केमिस्ट असोसिएशनतर्फे 35 हजाराची मदत
केमिस्ट असोसिएशन तर्फे रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन ड्यूरो सिलेंडर बसविण्यासाठी रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनतर्फे 35 हजार रुपये रकमेचा चेक तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संजय चौधरी, सहसचिव प्रवीण सरोदे, विजय चौधरी, अजय पाटील आदी उपस्थित होते तर रावेर शहराच्या डूक्टरांकडून 18 हजाराची मदत करण्यात आली.