रावेर : रावेरात दलित वस्तीच्या कामांवरून येथील पंचायत समितीच्या जिल्हा परीषद बांधकाम विभागाच्या आवारात दोन ठेकेदारांमध्ये प्रचंड शाब्दीक बाचाबाची झाल्याने शहरात खळबळ उडाली. रावेर तालुक्यात दलित वस्तीच्या कामांसाठी सुमारे साडे सहा कोटींची कामे मंजूर झाली असून ही कामे मिळवण्यासाठी ठेकेदार ग्रामपंचायतीला लॉबिंग लावत असतात तसेच टक्केवारी देऊन कामे करत असल्याची चर्चा आहे. दलित वस्तीच्या कामांमध्ये यापूर्वी भ्रष्ट्राचार होत असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आले आहे. आता मात्र मंजूर झालेल्या कामांमध्ये पारदर्शकपणाने कामे व्हावीत, अशी अपेक्षा सर्वसाधारण जनतेतून व्यक्त होत आहे.