रावेर : नोकरी देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे दाखवत एक लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविराधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल पुंडलिक धनगर (27, रा.कुसुंबा खुर्द) यांना संशयीत आरोपी दिनेश सोपान पाटील (रा.वरणगाव फॅक्टरी) आणि रमेश विश्वनाथ सरोदे (ओझरखेडा) यांनी वरणगाव फॅक्टरीत नोकरी लावून देतो, असे कुसुंबा येथे झालेल्या बैठकीत जानेवारी 2018 मध्ये सांगितले. त्यानुसार राहुलने नोकरी मिळेल या आशेने वेळोवेळी एकूण एक लाख 92 हजार रुपये घेतले आणि कंपनीचे बनावट पत्रक तयार करून राहुलला दिले. राहुल धनगरने कागदपत्रे घेवून गेले असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रावेर पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी दिनेश सोपान पाटील (रा.वरणगाव फॅक्टरी) आणि रमेश विश्वनाथ सरोदे (ओझरखेडा) यांच्या विरोधात फिर्यादी दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सतीश सानप व जितेंद्र पाटील करीत आहेत.