रावेरात नोटबंदीचा काळादिवस साजरा

0

रावेर । रावेर तालुका कॉग्रेस कमिटी तर्फे नोटबंदी विरोधात माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून काळा दिवस साजरा करून नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 8 नोहेंबर दिवस कॉग्रेसपक्षातर्फे काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. येथील पक्षाच्या कार्यालयातून तहसीलवर काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, ज्ञानेश्‍वर महाजन, डॉ.शब्बीर शेख, राजीव पाटिल, अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक खराले, गुलाब तडवी, डॉ. सुरेश पाटील यांच्यासह मोठ्या संखेने कॉग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.