रावेर : माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी यांच्या गोठ्यातून बैलासह जर्सी गाय चोरट्याने चोरून नेली. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.रावेर स्टेशन रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपानजीक माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी यांच्या घरामागील बाजुस गुरांचा गोठा आहे. या गोठ्यातून 26 फेब्रूवारीच्या रात्री सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा बैल व 4 ते 10 मार्चच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने याच गोठ्यातून 20 हजार रुपये किंमतीची जर्सी गायीची वासरी चोरुन नेली आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.