रावेर- शहरातील छोरीया मार्केटमधील जनरल स्टोअर्समधून चोरट्यांनी दोन हजार सातशे रुपये चोरुन नेल्याने खळबळ उडाली आहे. निंबोल येथील विजय सावळे यांचे सखी श्रृंगार व जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. 14 रोजी रात्री निंबोल येथील गोंड्या नामक चोरटयाने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करीत दुकानाच्या गल्ल्यातून दोन हजार सातशे रोख व काळ्या रंगाचे कागद पत्र असलेले पाकिट लांबवले. याबाबत विजय सावळे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय जावरे करीत आहेत.