रावेरात भाजपा आमदार निलंबनाचा निषेध : तहसीलदारांना निवेदन

रावेर : पावसाळी अधिवेशनात भाजपा आमदारांचे निलंबन करून लोकशाहीची गळचेपी करणार्‍या महाआघाडी सरकारचा रावेर तालुका भाजपा पदाधिकार्‍यांनी निषेध केला. प्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना निवेदन देण्यात आले.

यांची निवेदन देताना उपस्थिती
यावेळी निवेदनावर भाजपा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश धनके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस सी.एस.पाटील, महेश चौधरी, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, योगीता वानखेडे, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश पाटील, अमोल पाटील, शिवाजीराव पाटील, संदीप सावळे, हरलाल कोळी आदीच्यां निवेदनावर सह्या आहेत.

तहसीलच्या प्रवेशद्वारावरच आंदोलनाने खळबळ
रावेर तालुका भाजपाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात आले असता गेटजवळ तहसीलदार यांनी निवेदन घेण्यास नकार दिला व पाच पदाधिकार्‍यांनीच निवेदन घेऊन तहसीलदारांच्या चेंबरमध्ये यावे, असे फर्मान सोडल्यानंतर भाजपा पदाधिकार्‍यांनी तहसीलच्या गेटजवळच धरणे आंदोलन सुरू केले. याची वार्ता तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी गेटजवळ येत निवेदन स्वीकारले.