रावेर । शासनाच्या व सत्ताधारी पक्षाच्या असंवेदनशील कारभारामुळेच स्व. धर्मा पाटलांना आत्महत्या करावी लागण्याने आज राष्ट्रवादी तालुका कॉग्रेस पक्षाकडून निषेध नोंदवून या बाबतचे निवेदन नायब तहसीलदाराला कविता देशमुख यांना देण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, माजी आमदार अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, संभाजी बिग्रेड तालुकाध्यक्ष विलास ताठे, पं.स. सदस्य योगेश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण मोपारी, तालुका युवक उपाध्यक्ष विनोद चौधरी, सिताराम पाटील, जिजाबराव पाटील, केदारनाथ पाटील, कलेश महाजन, भाऊराव तायडे, शेख महमुद यांच्यासह मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.