रावेरात भूमिहिनांचे न्यायासाठी साखळी उपोषण

0
रावेर – तालुक्यातील उदळी, गाते येथील भूमिहिन शेतमजूरांना महसूल विभागाने मंजूर केलेले प्लॉट त्वरीत मिळावे यासाठी येथील तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करून मागण्याचे निवेदन तहसीलदार विजयकुमार ढगे यांना देण्यात आले.
उदळी गाते येथील भूमिहिन शेतमजुरांना गावठाण विस्तार योजनेंतर्गत उदळी येथे 36/2/2 व गाते  येथील 8/1/2 प्लॉट लाभार्थींना त्वरीत मिळण्यासाठी जळगाव जिल्हा केळी कामगार युनियनतर्फे साखळी उपोषण करण्यात आले. मोठ्या संख्येने प्लॉट वंचित शेतमजूर उपस्थित होते.