रावेर । शासन शेतकर्यांच्या पाठीशी असून त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आजचे मका, ज्वारी खरेदी केंद्र सुरु केल्याचे प्रतिपादन आमदार हरिभाऊ जावळे यांनी केले. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, बाजार जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समिती सभापती डॉ.राजेंद्र पाटील, उपसभापती प्रमोद धनके, जि.प. सदस्य आत्माराम कोळी, पं.स.सभपती माधुरी नेमाळे, प्रल्हाद पाटील, पं.स. सदस्य जुम्मा तडवी, योगेश पाटील, पी.के. महाजन, कविता कोळी, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष अमोल पाटील यांची उपस्थिती होती
.
विरोधक आक्रमक
यावेळी आ जावळे शेतकर्यांच्या हिताच्या प्रश्नावर बोलत असतांनाच माजी आमदार अरुणदादा पाटील यांनी मध्येच थांबवून शेतकरी कर्जमाफी विजबिल, हमीभावावर विचारुन कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोपान पाटील, रमेश पाटील यांनीही प्रश्नाचा भडीमार केल्याने अनेक मान्यवरांची मनोगते बाकी असतांना कार्यक्रम संपवून काढतापाय घेतला.