रावेरात मोबाईल दुकान फोडले : व्यावसायीकांमध्ये घबराट

0

रावेर : शहरातील एम.जी.मार्केट परीसरात असलेले तीन मोबाईल दुकाने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून मोबाईलसह रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या चोरीमुळे रावेरात खळबळ उडाली असून व्यावसायीकांमध्ये घबराट पसरली आहे.

एकाचवेळी तीन दुकाने फोडली
रावेर शहरातील गजबजलेल्या महात्मा गांधी मार्केट परीसरात असलेले बाबा मोबाईल, सुनील मोबाईल आणि खुशी मोबाईलचे मध्यरात्री चोरट्यांनी शटर उचकावून दुकानातील मोबाईल व रोकड लंपास केली. चोरीची माहिती मिळताच रावेर पोलिसात घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय व रोजगार बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रोजंदारी नसल्याने तरुण मंडळी आता चोरी करण्याकडे वळली असून शहरात दुकाने फोडण्यासाठी चोरट्यांनी टॉमीचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.