पदाधिकारी निवडीत एकमत न झाल्याचा फटका ; निवडीचे अधिकार पक्ष संघटनेला
रावेर:– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी निवडीत एकमत न झाल्यामुळे या पदाच्या निवडीचे अधिकार जिल्हा पक्ष संघटनेला देण्यात आले. रावेर शहरातील पक्ष कार्यालयात शुक्रवारी पक्षाचे निवडणूक निरीक्षक नामदेवराव चौधरी, राजेश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, सोपान पाटील, रमेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
तीन प्रदेश प्रतिनिधींसाठी चार, सहा जिल्हा प्रतिनिधींसाठी दहा, एक विधानसभा क्षेत्र प्रमुख पदांसाठी पाच, तालुकाध्यक्ष पदासाठी सात, रावेर शहराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज प्राप्त झाले. राजेश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष गोटू शेठ यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राजेंद्र चौधरी, रमेश महाजन, प्रवीण पाटील, समाधान साबळे, एल.डी.निकम, शेख मेहमूद, मधूकर पाटील, किशोर पाटील, सचिन पाटील, सुनील कोंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.