रावेर । शहरातील स्टेशनरोडवर तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना आज घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीस रावेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे कृत्य केल्यान त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपुर येथील 31 वर्षीय तरुणी स्टेशन रोडने अकरावाजेच्या सुमारास जात असतांना तालुक्यातील नीरुळ येथील विनायक धनसिंग पाटील याने मोटरसाइकल आडवी लावून उतरून थांबला आणि अश्लिल हावभाव केल्याप्रकरणी विनयभंग करून जीवे ठार मरण्याची धमकी दिली. म्हणून रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार दीपक ढोमणे, नेताजी वंजारी करीत आहे. सदर पिडित तरुणीची विनयभंग करणार्या आरोपी विनायक पाटील याची कॉलर पकडून चांगलाच चोप दिते नेले. स्टेशन रोड पासून ते ग्रामीण रूग्णालया पर्यंत नेले त्यावेळी रावेर शहरवासियांनी एकच गर्दी केली होती अखेर फैजपुर येथील तरुणीस स्थानिकांनी पोलिस स्टेशन दाखविल्यानंतर आरोपीस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.