रावेर- शहरात मोबाईलद्वारे सट्ट्याचे आकडे घेणार्यास पोलिसांनी अटक केली. फिरोज बुरान तडवी असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर फौजदार मनोहर जाधव, कॉन्स्टेबल हरीलाल पाटील, भरत सोपे, जाकिर पिंजारी आदींच्या शहरातील चौकातील डी.पी.जवळ फिरोज बुरान तडवी यास सट्ट्याचे आकडे घेताना पकडले. आरोपीच्या ताब्यातून 410 रुपये व एक 500 रुपये किीमतीचा मोबाइल पोलिसांनी जप्त करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.