रावेरात सामूहिक सोहळ्यात 14 जोडपी विवाह बंधनात

0

तालुका मुस्लिम समाज व मुस्लिम पंच कमेटीचा उपक्रम

रावेर- शहरातील शादी हॉलमध्ये रावेर तालुका मुस्लिम समाज व मुस्लिम पंच कमेटीतर्फे झालेल्या चौथ्या सामूहिक विवाह सोहळ्यात 14 जोडपी विवाह बंधनात अडकली. उद्घाटक म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी होते. याप्रसंगी रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, हरीश गणवाणी, अ‍ॅड.एम.ए.खान, सोपान पाटील, राजू महाजन, डी.एन.महाजन, सुधाकर झोपे, अ‍ॅड.सुरज चौधरी, अय्युब मेम्बर, इरफान मेम्बर (चिनावल), मुन्ना अग्रवाल, गोपाल बिरपन, उमेश महाजन, समाधान साबळे, दिलीप कांबळे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, सहाय्यक उपनिरीक्षक दीपक ढोमणे आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परीश्रम
विवाह सोहळा यशस्वीतेसाठी शेख कालू शेख गुलाम, रफिक भाई, आसीफ मोहम्मद, असद खान मेम्बर, गयास भाई शेख, युसूफ खान, सादीक मेम्बर, कालू पहेलवान, सय्यद आरिफ, डॉ.सत्तार, सलाउद्दीन जाहिद, मेहमूद हाजी, रुकको मास्टर आदींनी परीश्रम घेतले.