रावेरात सोशल डिस्टन्स पाळत पार पडला आदर्श विवाह

0

रावेर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेले संचारबंदीचे नियम लक्षात घेता येथील पत्रकार देवलाल पाटील यांच्या कन्येचा विवाह घरातच मोजक्या पाच पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला. या निर्णयाचे शहर व परीसरात कौतुक होत आहे. सध्या कोरोना संचारबंदीमुळे अनेकांनी शुभविवाहाच्या तारीख निश्चित होऊनही विवाह धामधुमित करण्यासाठी पुढील वर्षी करण्याचा निश्चय केला आहे तर काहींनी ठरलेल्या तारखेस विवाह सोहळा करण्याचा निर्णय मोजक्याच वधू-वर पित्यांनी घेतला आहे. वधू-वर पक्षाकडील मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितील सोशल डिस्टन्स पाळून विवाह सोहळा घरातल्या घरात पार पडत आहेत. मुंजलवाडी (ता.रावेर) येथील रहिवासी व सध्या रावेर येथे स्थायिक असलेले दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवलाल पाटील यांची कन्या रुपाली व अंजनसोंडे (ता.भुसावळ) येथील कै.छगन तुळशीराम पाटील यांचे सुपूद्ध सचिन यांचा शुभविवाह वर-वधू पक्षाकडील मंडळींनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत उरकून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व नुकताच सोशल डिस्टन्स पाळून कोणताही गाजावाजा न करता हा विवाह सोहळा पार पडला. या निर्णयाचे शहर व परीसरात कौतुक होत आहे.