रावेरात सोशल डिस्टन्स राखत पार पडला आदर्श विवाह

0

रावेर : कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी कोणतेच औषध नाही. त्यावर सोशल डिस्टन्सिंग हाच एक उपाय ासून लॉकडाउनचे उल्लंघण न करता सोशल डिस्टन्सिंग पाळत रावेरात आदर्श विवाह सोहळा पार पडला. नातेवाइकांनी व्हिडिओ कॉलद्वारे विवाहित दाम्पत्याला शुभाशिर्वाद दिले.

अवघ्या पाच लोकांची उपस्थिती
रावेरात झालेल्या या आदर्श विवाहात अवघ्या पाच जणांची उपस्थिती होती. रावेर येथील रवींद्र तुकाराम महाजन यांची कन्या स्नेहा व केर्‍हाळा येथील मोहन राजाराम पाटील यांचे चिरंजीव वैभव यांचा विवाह सोहळा घराच्या हॉलमध्ये चार लोक व एक ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत झाला. वधू स्नेहा ही डॉ.प्रवीण चौधरी व डॉ.चैताली चौधरी (समृद्धी हॉस्पिटल, रावेर) यांची भाची आहे. या आदर्श विवाहा प्रसंगी डॉ.प्रवीण चौधरी व चैताली चौधरी यांच्याकडून वधू-वरास आशीर्वाद म्हणून काही सोन्याच्या भेटवस्तू व काही गरीब व गरजू कुटुंबाना प्रत्येकी 500 रुपयांची मदत देण्यात आली. वधू-वर यांना नातेवाईक मंडळींनी ऑनलाईन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे लॉक डाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सचे पालन करीत आदर्श विवाह सोहळा 29 रोजी पार पडला.