रावेर : राज्यातील एस.टी.कर्मचार्यांच्या संपाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे कर्मचारी आत्महत्याचा प्रकार थांबलेला नाही. रावेर आगारातील चालक कन्हैया भिका अटकाळे (47) यांनी शनिवारी रात्री नऊ वाजता राहत्या घराच्या छातास दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर रावेर आगारातील कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एस.टी.कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपात अटकाळे सहभागी होते त्यामुळे ते कामावर हजर नव्हते अशी माहिती आगार प्रमुख बेंडकुळे दिली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके, कारण समजू शकलेले नाही. येथील पोलिसात विशाल अटकाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहेत.