रावेर । येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रंजना गजरे यांची सोमवार 24 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. येथील पालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी नगरसेवकांची विशेष सभा तहसिलदार विजयकुमार ढगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रंजना गजरे यांचा उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने पिठासन अधिकारी ढगे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
विशेष सभेत यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्ष दारा मोहमंद, नगरसेवक आसिफ मोहमंद, अॅड. सुरज चौधरी, सुधीर पाटील, प्रल्हाद महाजन, राजेंद्र महाजन, जगदीश घेटे, यशवंत दलाल, असदुल्ला खान, प्रकाश अग्रवाल, नगरसेविका संगिता अग्रवाल, संगिता महाजन, शारदा चौधरी, ललिता बर्वे, संगिता वाणी आदी उपस्थित होते. निवड प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे यांचे सहकार्य लाभले.