रावेर कृउबात दिड कोटींची शिल्लक, दोन कोटींची कामे प्रस्तावीत

0

रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी

रावेर- बाजार समितीला माझ्या कार्यकाळात सुमारे दीड कोटीची शिल्लक रक्कम ठेवून दोन कोटींचे कामे प्रस्तावित केली असून गत 56 वर्षांपासून प्रलंबित ले-आऊट सर्व संचालक व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने मंजूर केल्याचे मावळते सभापती निळकंठ चौधरी यांनी बैठकीत सांगितले. रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीची उत्पन्न बाजार समितीची शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यावेळी मागील कामकाजाचा आढावा घेऊन जमा-खर्चाला मंजुरी देण्यात आली. मावळते सभापती नीळकंठ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. याप्रसंगी चौधरी पुढे म्हणाले की, शेतकरी हिताची व विकासात्मक कामे आपल्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाली असून त्यात रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पार्किंग, पत्री शेड, रावेर व सावद्याच्या गोडावून ले-आउटला मंजुरी दिली आहे तर सुमारे दोन कोटींची कामे प्रस्तावित आहेत. या कामाची दखल घेऊन सभेत अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी उपसभापती अरुण पाटील, संचालक गोंडू महाजन, श्रीकांत महाजन, डी.सी.पाटील, गोपाळ नेमाडे, योगेश पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, विनोद पाटील, उस्मान मेहमूद, पितांबर पाटील, प्रमोद धनके आदी सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचलन बाजार समिती सचिव गोपाळ महाजन यांनी केले.