रावेर कृउबा उपसभापती नीळकंठ चौधरी बिनविरोध

0

उपसभापतीपदी अरुण पाटील यांची वर्णी

रावेर- रावेर बाजार समितीच्या सभापतीपदी नीळकंठ चौधरी यांची तर उपसभापतीपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ठरल्याप्रमाणे माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर गुरुवारी निवड झाली. सभापतीसाठी चौधरी तर उपसभापती पदासाठी पाटील यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस.एफ.गायकवाड व डी.डी.पाटील यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवडीप्रसंगी यांची उपस्थिती
कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य डॉ.राजेंद्र पाटील, प्रमोद धनके, पितांबर पाटील, दिलीप पाटील, राजीव पाटील, गोपाळ नेमाडे, पंकज येवले, गोंडु महाजन, योगेश पाटील, विनोद पाटील, प्रमिला पाटील, कल्पना पाटील, श्रीकांत महाजन, अरुण पाटील, उम्नान तडवी, कैलास सरोदे, पंकज येवले, सै.असगर, योगेश भंगाळे, जनाबाई महाजन, अर्जुन महाजन आदींसह माजी आमदार अरुण पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, नगरसेवक शिवाजीराव पाटील, राजू ठेकेदार, प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी युवकध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, गणपत शिंदे, सुनील महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव गोपाळ महाजन आदींची उपस्थिती होती.