रावेर । रावेर कृषि उपन्न बाजार समीतीचे सभापती उपसभापती पदाचे राजीनामा देण्यात आला आहे. रावेर कृषी उत्पन्न बाजार समीतीची आज सर्वसाधारण सभा झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून ठरल्याप्रमाणे उपसभापती प्रमोद धनके यांनी आपल्या पदाचा राजीनामा सभापती यांच्याकडे सुपूर्थ केला तर सभापती डॉ. राजेंद्र पाटील यांनी आपला राजीनामा जिल्हा उपनिबंधक आधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पितांबर पाटील, निळकंठ चौधरी, दिलीप पाटील, गोपाळ नेमाळे, योगेश पाटील, श्रीकांत महाजन, गोंडू महाजन, प्रमीला पाटील, जनाबाई महाजन, कैलास सरोदे, विनोद पाटील, कल्पना पाटील आदि संचालक उपस्थित होते.