रावेर- डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परीषद, जळगावच्या वतीने पंचायत समिती रावेरचे गटशिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक गौरव पुरस्कार कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. ‘शैक्षणिक प्रशासन’ या गटात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली होती. पुरस्कार समारंभास परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील-भोयर, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, शिक्षक नेते हणमंतराव पवार, डॉ.विलास पाटील, राम पवार, विनोद पाटील, राकेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.