तहसीलदारांना नागरीकांचे निवेदन ; दरवाढ रद्द करण्याची मागणी
रावेर- रावेर नगरपालिकेने पालिका हद्दीबाहेरील ग्रामीण वसाहतींना पाणीपट्टी दरात केलेली दरवाढ कमी करून मिळावी, अशी मागणी वसाहतीतील नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली आहे. गतवर्षी रावेर ग्रामीण नववसाहती साठी दोन हजार रुपये पाणीपट्टी होती मात्र सन 2018-19 या वर्षासाठी तीन हजार 400 रुपये इतकी वाढीव पाणीपट्टी दर आकारण्यात आला आहे. रावेर ग्रामीणला पालिकेकडून अनेक वर्षापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तसेच वेळी-अवेळी पाणी मिळत असल्यामुळे महिलांची दमछाक होत असते. पालिकेने पाणीपट्टीत केलेली दरवाढ कमी करून मिळावी अशा आशयाचे निवेदन वसाहतीतील प्रोफेसर कॉलनी, उटखेडा रोड, श्रीकृष्ण नगर, विश्वकर्मा नगर व शिवमनगरायासह विविध नगरातील नागरीक, महिलांनी तहसीलदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन केली आहे.
यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, स्वामी फाऊंडेशनचे रवींद्र पवार, विष्णू महाजन, देविदास महाजन यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. अरुण वाणी, निर्मला पवार, मथुराबाई पाटील, प्रकाश माळी, भागवत महाजन, कल्पना सपकाळे, मदनसिंग परदेशी, पुष्पा चौधरी, विजया महाजन, प्रकाश चौधरी, शशिकांत हिवरे, प्रेमचंद चौधरी, सुरेखा सैतवाल, रवींद्र रामकृष्ण पाटील, प्रभाकर सुरवाडे, संदीप महाजन, अर्जुन भोई, कैलास भोई, चंपालाल बारी, प्रदीप देशमुख, धनराज वारी, कैलास दारकोंडे, सुरेश शिंदे, राहुल चौधरी, आर.सी.पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.